
अमळनेर:- राष्ट्रीय लोकअदालतीत १०८ खटले निकाली लागले असून ८३ लाख ८० हजार १८ रुपयांची वसुली करण्यात आली. तीन महिला सासरी नांदण्यास गेल्या आहेत.

सोनाली संदीप मिस्त्री यांनी आपल्या पती संदीप काशिनाथ मिस्त्री विरुद्ध तक्रार केली होती. त्यांना पाच वर्षांचा कार्तिक नावाचा मुलगा आहे. गेल्या वर्षांपासून ते अलिप्त राहत होते. ऍड राकेश पाटील यांनी मध्यस्थी केल्याने लोकन्यायालयात समाजोता होऊन सोनाली सासरी नांदायला गेल्या. तसेच चोपडा तालुक्यातील वर्डी येथील दीपाली हिरालाल पाटील यांनी २०२२ मध्ये पती हिरालाल सुरेश पाटील यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार ची तक्रार केली होती. ऍड शिवकुमार ससाणे यांनी समाजोता घडवून आणला. यासह अजून एक मिळून एकूण तीन कुटुंबात समजोता घडवण्यात यश आले.
प्रलंबित १२३३ खटल्यापैकी ५६ प्रकरणे निकाली निघाले त्यात ५४ लाख ६६ हजार ७८९ रुपये वसूल करण्यात आले. तसेच दाखलपूर्व ३४७७ खटले लोकन्यायालायत ठेवण्यात आले होते त्यात ५२ खटले निकाली निघाले व २९ लाख १३हजार २२९ रुपये वसुली करण्यात आली.
पॅनल प्रमुख म्हणून तदर्थ न्यायाधीश छाया पाटील , वरिष्टस्तर दिवाणी न्यायाधीश प्रविण देशपांडे , सहदिवाणी न्यायाधीश निलेश यलमाणे , सह दिवाणी न्यायाधीश अमिता यादव , पॅनल सदस्य ऍड राजेंद्र भदाणे , ऍड जितेंद्र साळी , ऍड ज्योती बिऱ्हाडे यांनी काम पाहिले. लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी वकील संघाचे अध्यक्ष ऍड यज्ञेश्वर पाटील , उपाध्यक्ष ऍड नंदलाल सूर्यवंशी , ऍड चेतना पाटील ,ऍड राकेश पाटील , ऍड किशोर बागुल , ऍड जी वाय विंचूरकर , ऍड गोपाल सोनवणे ,ऍड विलास वाणी ,ऍड जगदीश बडगुजर , ऍड प्रशांत संदानशीव , ऍड पी आर बडगुजर , ऍड दिलीप पाटील , ऍड प्रदीप पाटील, ऍड माधुरी ढिवरे , ऍड प्रणिता गांधलीकर ,प्रताप वाघ, पी एस पांडव यांनी सहकार्य केले.




