अमळनेर:- तालुक्यातील निम येथे अंगणात लावलेल्या दोन दुचाकी रात्रीतून चोरीला गेल्याची तक्रार मारवड पोलीसात नोंदवण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निम येथील मयूर चंपालाल पाटील यांची ३५ हजार किमतीची होंडा शाइन मोटारसायकल (क्रमांक एमएच १९ डिडी ८७४१) ही १३ रोजी रात्री ९:३० वाजता अंगणात लावली होती. मात्र सकाळी ८ वाजता पाहिले असता दुचाकी दिसून आली नाही. परिसरात शोध घेताना समजले की, गावातील सुशीलकुमार सुधाकर पाटील यांची २५ हजार किमतीची विना क्रमांकाची होंडा युनिकॉर्न गाडी ही चोरीला गेली आहे. मयूर पाटील याने मारवड पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ सचिन निकम हे करीत आहेत.