अमळनेर:- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा अमळनेरात तीव्र निषेध नोंदवण्यात आला. आंबेडकर.. आंबेडकर काय करता, त्यापेक्षा देव, देव, केल असत तर स्वर्गात जागा मिळाली असती असे वक्तव्य केले होते. आंदोलनवेळी गृहमंत्री अमित शाह यांच्या पुतळ्याचे दहन करत तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
यावेळी महाराणा प्रताप चौक घोषणांनी दाणाणुन उठला होता. समाधान मैराळे, महेश पाटील, कृष्णकांत शिरसाठ, ऍड. प्रशांत संदानशिव, प्रविण बैसाणे, विशाल सोनवणे, आत्माराम अहिरे, सुभाष आगळे, भिका धनगर, रियाझ मोलाना, प्रकाश बिऱ्हाडे, नूर खान, अजय बिऱ्हाडे, भुपेंद्र शिरसाठ, राज मालचे, आदित्य शिरसाठ, विवेक शिरसाठ, विक्की सपकाळे, विशाल भिल, हर्षल सुतार, प्रेम मोरे, सागर भिल, दादू भिल, राहुल सोनवणे, कल्पेश बैसाने, दीपक पाटील, गोलू धनगर, पंकज शिरसाठ, दानेश पठाण आदी उपस्थित होते.