
अमळनेर:- समाज क्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री पुरुष समता, जाती निर्मूलन, ज्ञान निर्मिती, धर्मचिकित्सा, सामाजिक न्याय आणि आंतरजातीय विवाह या कृती कार्यक्रमांद्वारे सावित्रीबाई फुलेंनी पर्यायी संस्कृतीचा पाया घातला. क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी लावलेली ज्ञानज्योत आता मशाल झाली आहे ,असे भावपूर्ण उद्गार प्राचार्य डॉ प्रा लीलाधर पाटील यांनी वक्त्यांच्या कार्यशाळेत काढले.

युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर ,संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त वक्त्यांच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते .अध्यक्षस्थानी प्रा अशोक पवार होते .विचारपीठावर मार्गदर्शक श्रीमती आशा भीमराव महाजन( प्राथमिक शिक्षिका) या उपस्थित होत्या.
3 जानेवारी 2025 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती 101 ठिकाणी व्याख्यानांच्या माध्यमातून साजरी करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला संदीप घोरपडे यांनी पुष्पहार अर्पण केला व कार्यक्रमाला सुरुवात झाली याप्रसंगी मराठा सेवा संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.वक्त्यांच्या कार्यशाळेच्या प्रमुख मार्गदर्शक श्रीमती आशा महाजन यांनी सावित्रीबाईंच्या जीवनकार्यावर अभ्यासपूर्ण भाषण केले. सुप्रसिद्ध कवी अजय भामरे यांना दिल्ली येथे महात्मा ज्योतिराव फुले पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. पत्रकार उमेश काटे यांच्या वाढदिवसानिमित्त व महिला वक्त्या तरन्नूम शेख यांचा विशेष कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी ए पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन मराठा सेवा संघाचे अमळनेर तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी केले. याप्रसंगी कार्यशाळेत अशोक बिऱ्हाडे, योगेश पाटील ,योगेश भदाणे ,डॉ. राहुल निकम, डी एम पाटील, संजय सूर्यवंशी, संजय पाटील , गिरीश पाटील ,हर्षल खैरनार ,बापूराव ठाकरे, भैय्यासाहेब साळुंखे, संदीप खैरनार, भाविका वाल्हे ,सुनीता मोरे, प्रा उषा देवरे ,स्नेहल सिसोदे, अजिंक्य चिखलोद कर, कृष्णा चांभार ,मयूर पाटील आदी मान्यवर वक्ते उपस्थित होते,




