
अमळनेर :- येथील महसूल विभागाच्या पथकाने अवैध रित्या गौण खनिज वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर व एका टेम्पोवर सानेनगर व रणाईचे येथे कारवाई करून दोन्ही वाहने अमळनेर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.

अमळनेर तालुक्यात मोठया प्रमाणात गौण खनिज वाहतूक रात्रीच्या वेळी सुरू आहे. ह्या पथकाला रात्री रणाईचे ता.अमळनेर येथे गौण खनिज वाहतूक करतांना ट्रॅक्टर व सानेनगर तांबेपुरा येथे टेम्पो आढळून आला. पथकाने दोन्ही वाहनांवर कारवाई करून वाहने अमळनेर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत. प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे,तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी व्ही.पी पाटील,पी एस पाटील,ग्राम महसूल अधिकारी ए बी सोनवणे, आशिष पारधे, एम आर पाटील,जितेंद्र पाटील शिरसाळे, आय एस महाजन, जोगी, अभिमन महाजन, श्री.कदम आदींच्या पथकाने केली.




