
अमळनेर:- क. ब. चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागीय महिला क्रिकेट स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत प्रताप वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सृष्टी मिलिंदकुमार शिंदे, भाग्यश्री पाटील, नंदिनी जाधव, सायली सोनावणे यांची ७ ते १४ जानेवारी पासून होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेसाठी उदयपूर राजस्थान येथे निवड करण्यात आली.

प्रतापच्या खेळाडूंच्या यशाबद्दल खा. शि. मंडळ अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, विश्वस्थ वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी, कार्याउपाध्यक्ष निरज अग्रवाल,जेष्ठ संचालक हरी भीका वाणी,संचालक योगेश मुंदडा,डॉ. अनिल शिंदे, प्रदीप अग्रवाल,खा. शि. मंडळ सचिव व आदरणीय प्राचार्य डॉ. अरुण बी.जैन, सहसचिव डॉ. धीरज वैष्णव,उप प्राचार्य डॉ. कल्पना पाटील, प्रा. पराग पाटील, डॉ. अमित पाटील, डॉ. विजय मांटे,सी. सी. एम. सी प्रमुख डॉ. विजय तुंटे, डॉ. योगेश तोरवणे,जिमखाना समन्वयक व सिनेट सदस्य प्रा. डॉ. संदीप नेरकर ,IQAC प्रमुख डॉ. मुकेश भोळे,स्पर्धा संघ व्यवस्थापक व वरिष्ठ विभाग क्रीडा संचालक प्रा.डॉ.सचिन पाटील,कनिष्ठ क्रीडा विभाग संचालक प्रा. अमृत अग्रवाल,रजिस्टार राकेश निळे, प्रा.अर्चना पाटील,प्रशिक्षक संजय पवार, सचिन पवार,प्रशांत देवकाते व सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विदयार्थी, खेळाडू यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




