
अमळनेर:- तालुक्यातील लोंढवे शिवार परिसरात एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ८ रोजी उघडकीस आली आहे.

लोंढवे येथील सुनील दयाराम पाटील (वय ३५) तो ४ ताखेपासून बेपत्ता होता. त्याबाबत पोलिसांत त्याची हरवल्याची नोंद केली होती. मात्र तो लोंढवे शिवारात दिलीप भिमराव पाटील यांच्या दि ८ रोजी संध्याकाळी विहिरीत मृतावस्थेत आढळून आला. दरम्यान शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे याबाबत पोलीस पाटील प्रभाकर नवल पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.




