
अमळनेर: महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने पत्रकार दिनानिमित्त एक अद्भुत कार्यक्रम आयोजित केला. ‘जागर लोककलेचा नवरंग महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या लुप्त होत चाललेल्या कलांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक संदेश उमप यांनी आपल्या मधुर आवाजात विविध लोकगीते सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

६ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आणि मूकनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस निरीक्षक विकास देवरे व मुख्याधिकारी केजो मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे विभागीय उपाध्यक्ष प्रा विजय गाडे,तालुकाध्यक्ष समाधान मैराळे, सचिव सुरेश कांबळे उपाध्यक्ष नूर खान,प्रवीण बैसाणे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
संदेश उमप यांच्या गायनाने कार्यक्रमाला वेगळीच ऊर्जा मिळाली. त्यांच्या प्रत्येक गीताला प्रेक्षकांनी भरपूर दाद दिली. या कार्यक्रमातून नवीन पिढीला महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेची ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.




