
अमळनेर:- तालुक्यातील शिरसाळे येथे घराच्या सामाईक भिंतीवर सेटअप बॉक्स लावण्याच्या वादातून तिघांना मारहाण केल्याची घटना १५ रोजी दुपारी घडली आहे.

शिरसाळे येथील आबा कौतिक महाले (वय ४७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १५ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास फिर्यादी त्याच्या व शेजारच्या सामाईक भिंतींवर सेटअप बॉक्स लावत असताना त्याचा आवाज झाला. तो ऐकून शेजारी राहणारे रितेश महाले व मंगला सुभाष महाले यांनी फिर्यादी व कुटुंबीयांना शिवीगाळ सुरू केली. थोड्या वेळाने सुभाष एकनाथ महाले हा दारू पिऊन काठी घेऊन तर रितेशभा लोखंडी रॉड घेऊन आला व फिर्यादीला मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादीची आई व मुलगा सोडवायला आले असता त्यांना ही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत फिर्यादीच्या डोक्याला व उजव्या हाताच्या अंगठ्याचा दुखापत झाली. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन आबा महाले यांनी मारवड पोलिसांत तक्रार दाखल केल्याने सुभाष एकनाथ महाले, रितेश सुभाष महाले, मंगला सुभाष महाले या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५, ३५२,३५५ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ विनोद साळी हे करीत आहेत.





