
अमळनेर:- उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तालुक्यातील शिरसाळे येथील पोलिस पाटील रामचंद्र चौधरी यांचा जळगाव जिल्ह्याचे एसपी महेश्वर रेड्डी यांच्याहस्ते नुकताच गौरव करण्यात आला.

शिरसाळे येथील पोलीस पाटील रामचंद्र वंजी चौधरी यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन दिनांक १६ रोजी जळगाव जिल्ह्याचे एस पी महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले, त्यावेळी ॲडिशनल मॅडम एसपी कविता नेरकर, ॲडिशनल एसपी नखाते, मारवड पोलीस ठाण्याचे एपीआय जिभाऊ तुकाराम पाटील, पीएसआय विनोद पाटील, पीएसआय बोरकर, यांच्यासह उदय पाटील (लोण खुर्द), डॉ. दत्ता ठाकरे (वावडे),विनोद बोरसे (सात्री), दिनेश पाटील (शिरसाळे), उमाकांत पाटील (पाडळसरे) आदी पोलीस पाटील बांधव उपस्थित होते.





