
अमळनेर:- तालुक्यातील कलाली शेतशिवारात अनोळखी इसमाने झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना १६ रोजी उघडकीस आली आहे.

तालुक्यातील बोहरा येथील नाना धनगर यांचे कलाली शिवारात शेत असून १६ रोजी त्यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला अज्ञात इसमाने गळफास घेतल्याचे दिसून आले. परिसरात विचारपूस केली असता मयताची ओळख पटली नाही. त्यास अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन करण्यासाठी नेण्यात येऊन मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेकॉ सुनील पाटील हे करीत आहेत.





