
अमळनेर:- तालुक्यातील लोण सिम येथील ३५ वर्षीय बेपत्ता इसमाचा मृतदेह विहिरीत आढळल्याची घटना १६ रोजी दुपारी उघडकीस आली आहे.

तालुक्यातील लोण सिम येथे राहणारा प्रमोद शांताराम बोरसे (३५) हा १५ रोजी दुपारी १२ वाजता शेतात जाऊन येतो असे सांगून निघाला. रात्री उशिरा पावतो तो परत न आल्याने नातेवाईकांनी परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. १६ रोजी दुपारी त्याची चप्पल भिकूबाई शांताराम बोरसे यांच्या शेतात विहिरीजवळ दिसून आली. विहिरीत उतरून गावकऱ्यांनी शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ विनोद साळी हे करीत आहेत.





