
अमळनेर – गेल्या महिनाभरापासून प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या वेवोतोलू कोझी यांना भावपूर्ण निरोप पालिकेतर्फे देण्यात आला.
अमळनेर नगरपालिकेत मुख्याधिकारी व प्रशासक यांचा कार्यभार अनुभव साठी शासनाने त्यांना दिला होता.
दि. १७ रोजी त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम नगरपालिकेत मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमाला माजी नगरसेवक मुन्ना शर्मा व काँग्रेसचे नेते डॉ. अनिल शिंदे, नगरपालिकेतील सर्व विभाग प्रमुख सर्व संघटनेचे पदाधिकारी आणि नगरपालिका सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून त्यांनी एक महिन्यात लावलेली शिस्त आणि नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना दाखवलेला आपलेपणामुळे त्या एक महिन्यात सर्वांना आपल्याशा वाटायला लागल्या असे आपल्या भाषणात सर्वांनी सांगितले.
याप्रसंगी मुन्ना शर्मा, डॉ. अनिल शिंदे, तुषार नेरकर, अनिल बेंडवाल, अकाउंटंट सुदर्शन शामनानी, अभियंता दिगंबर वाघ, प्रसाद शर्मा, अविनाश संदानशिव चव्हाण, शेखर देशमुख, मनोज शर्मा, मदन पाटील बहुसंख्य कर्मचारी सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांनी त्यांच्याविषयी आदर व अगदी आनंदाचे वातावरण एक महिन्यात होते. असे आपल्या भाषणात सांगितले. कोझी यांनी सांगतांना मला अमळनेरकरांनी समजून घेतले व सर्व लोकांनी मला कर्मचाऱ्यांनी मला चांगले सहकार्य केले. म्हणून आपल्या अमळनेरकरांच्या मनात व नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मनात व ऋणात राहू इच्छिते असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. आभार प्रदर्शन अभियंता दिगंबर वाघ यांनी केले