
बँकेच्या अद्ययावत अशा नूतन कार्यालयाचे थाटात उद्घाटन
अमळनेर– 100 व्या वर्षाकडे पदार्पण करणाऱ्या अमळनेर अर्बन बँकेस सर्व आजी माजी पदाधिकारीनी प्रगती पथावर आणले असून आज अद्ययावत अशा कार्यालयाचे नुतनीकरण झाल्याने या कार्याला माझा आशीर्वाद आहे,प्रगती गाठत असलेल्या या बँकेने अजून आपल्या शाखा सुरू कराव्यात,बँकेची उत्तम आर्थिक स्थिती पाहता 100 टक्के त्या यशस्वी होतील असा विश्वास प पु संत श्री प्रसाद महाराजांनी व्यक्त केला.
दि अमळनेर को. ऑप.अर्बन बँकेचे शतक महोत्सवी वर्षात पदार्पण होताना अर्बन बँकेच्या मुख्य कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले असून सदर नूतन कार्यालयाचे उद्घाटन आणि प्रथमच बँकेने काढलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन व पू संत श्री सखाराम महाराज यांच्या शुभहस्ते आणि खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या उपस्थितीत १७ जानेवारी करण्यात आले.अमळनेर अर्बन बँकेने आधुनिक बँकिंग सुविधांनी संपन्न अश्या सभासद व ग्राहकाभिमुख अद्ययावत मुख्य कार्यालयाचे नूतनीकरण केल्याने प्रसाद महाराज व खा.स्मिताताई वाघ यांनी कौतुक केले.खासदार वाघ यांनी आपली अर्बन बँक आज नावारूपाला आली आहे,100 वर्षांचे हे वटवृक्ष आहे, आपली हक्काची बँक असल्याने केव्हाही काहीही मदत सांगा मी नक्की सोबत असेन अशी ग्वाही त्यांनी दिली.
ग्राहकांना बँकिंगची सहज सुलभ माहिती देणारी दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन झाल्याने त्याचेही मान्यवरांनी कौतुक केले.यावेळी माजी चेअरमन कुंदनलाल अग्रवाल,गोविंद मुंदडा,बजरंगलाल अग्रवाल,शशांक जोशी, सरजू गोकलानी,माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी,खा शी मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक,पांडुरंग महाजन,मुरलीधर बितराई,खा शी मंडळाचे माजी चेअरमन जितेंद्र जैन,ऍड विवेक लाठी,वकील संघाचे अध्यक्ष ऍड किरण पाटील,पत्रकार किरण पाटील,चेतन राजपुत, जितेंद्र ठाकूर,मुन्ना शेख तसेच बँकेचे विद्यमान चेअरमन पंकज मुंदडा,व्हा चेअरमन रणजीत शिंदे,संचालक मोहन सातपुते,प्रविण जैन,पंडित चौधरी,दीपक साळी,अभिषेक पाटील,प्रविण पाटील,प्रदीप अग्रवाल,भरत ललवाणी,अभिषेक पाटील,लक्ष्मण महाजन,सौ वसुंधरा लांडगे,डॉ मनीषा लाठी,मॅनेजर अमृत पाटील तसेच अर्बन बँकेचे सर्व आजी व माजी संचालक व सभासद आणि कर्मचारी वृंद व ,पिग्मी एजेंट उपस्थित होते.सूत्रसंचालन व्हा.चेअरमन रणजित शिंदे यांनी केले.