
अमळनेर : वीज चोरीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महावितरणच्या जिल्हास्तरीय २० पथकांनी एकाचवेळी १५ रोजी अमळनेर शहरात विविध ठिकाणी छापे टाकले असता ११६ वीज चोर सापडले.
महावितरणचे जळगाव जिल्हा अधीक्षक अभियंता अनिल महाजन यांच्या मार्गदर्शनाने धरणगाव चे कार्यकारी अभियंता निलेश सोनगीरे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यातील व वीज केंद्रावरील कर्मचारी अभियंते अशा २० पथकांनी १५ रोजी अमळनेर शहरात ताडेपुरा , गलवाडे रोड ,ढेकू रोड ,पिंपळे रोड , बाजारपेठ ,झामी चौक , माळीवाडा , तांबेपुरा ,मुंदडा नगर , भालेराव नगर ,धुळे रोड यासह सुमारे ६०० ठिकाणी छापे मारले. त्यापैकी ११६ ठिकाणी ओज चोरी होत असल्याचे उघड झाले. याठिकाणी तात्काळ मीटर जप्त करण्यात येऊन नागरिकांची असुविधा होऊ नये म्हणून त्यांना नवीन मीटर जोडण्यात आले. जप्त मीटर तपासणीसाठी धरणगाव येथे पाठवण्यात आले आहेत. त्रुटी आढळून आल्यास अथवा मीटर मध्ये फेरफार केल्यास त्यांना दंड व चोरी केलेले बिल पाठवण्यात येईल तात्काळ बिल न भरल्यास रीतसर पोलिसात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
महावितरणकडे अत्याधुनिक प्रणाली असल्याने वीज चोरी , मीटर मध्ये हस्तक्षेप , छेडछाड हे प्रकार लगेच कंपनीच्या लक्षात येते. त्यामुळे आता चोरट्यानी वीज चोरीकडे दुर्लक्ष करू नये – तुषार नेमाडे, महावितरण