
अमळनेर -स्वराज्य जननी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्ताने कुणबी पाटील समाज बहुउद्देशीय मंडळ अमळनेर व कुणबी पाटील समाज महिला मंडळ यांच्या कडून जिजाऊ जयंती व महिलांसाठी हळदीकुंकूचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात संत तुकाराम महाराज व जिजाऊ मातेच्या प्रतिमेचे आणि स्वामी विवेकानंद व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचेही पूजन करण्यात आले,यानंतर जिजाऊ वंदना झाली, शिवकन्या गाण्यावर लहान मुलींनी नृत्य सादर केले. कुणबी पाटील समाजातील ज्येष्ठ महिला माता भगिनींचा सत्कार करण्यात आला. उखाणे घेऊन त्यात वान हि महिलांसाठी देण्यात आले. समाजात पहिल्यांदा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी समाजातील माता भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.न्यू व्हीजन स्कुलच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला.यासाठी सौ वैशाली पाटील,सौ शितल सावंत,सौ सविता पाटील,सौ नेहा पाटील,सौ रत्नाबाई पाटील,आणि महिला भगिनींनी परिश्रम घेतले. कुणबी पाटील समाजाचे अध्यक्ष शेखर लोटन पाटील (गोविंदा पाटील ) व समस्त कार्यकारणी मंडळ सदस्य यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला.





