
अमळनेर:- श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीच्या समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे आय डी एफ सी फर्स्ट बँक अधिकारी टीम कडून सी एस आर भारत एम्प्लॉइ व्हालंटरिंग प्रोग्राम अंतर्गत वातावरण बदल, वित्तीय साक्षरता कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी डिजीटल साक्षरता, ऑनलाईन फसवणूक, बँकिंग सेवा करीअर, सायबर चोरी, वातावरण बदल अश्या विषयावर परिसंवाद झाला.

याप्रसंगी आयडीएफसी फर्स्ट बँकेचे शाखा व्यवस्थापक प्रशांत डाबरे, बँक अधिकारी संघपाल झालटे, निलेश पाटील,प्रदीप पाटील, देवेंद्र माळी, प्रदीप ठाकरे, भावेश बिरारी, पंकज राणे , महेश पाटील यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी प्राचार्य डॉ पी एस पाटील,प्रा विजयकुमार वाघमारे, डॉ भरत खंडागळे, प्रा धनराज ढगे, डॉ अनिता खेडकर, डॉ जगदिश सोनवणे, डॉ श्वेता वैद्य प्रा उदय महाजन यांनी उपस्थीती दिली. याप्रसंगी प्रश्न मंजुषा उपक्रम घेऊन विद्यार्थ्याना बँकेकडून भेट वस्तू देण्यात आल्या.





