
अमळनेर-शहरातील भगिनी मंडळ संचलित आदर्श प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आनंद मेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्षा सरोज भांडारकर यांच्या हस्ते झाले.

मेळाव्यास रंजनी केले, मंगला पाटील, मोहिनी खाडिलकर, अनुरूपा भांडारकर, वनश्री अमृतकार, उज्वला शिरोडे आदी मंडळ पदाधिकारी उपस्थित होते. शाळेत दरवर्षी अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांच्या विविध गुणांना वाव मिळण्यासाठी अनेक उपक्रम घेण्यात येत असतात. विद्यार्थ्यांनी आनंद मेळाव्यात विविध खाद्यपदार्थ घरून तयार करून त्यांची विक्री केली. विद्यार्थ्यांनी आनंद मेळाव्यात विविध खाद्यपदार्थ विकत घेत त्यांचा स्वाद घेत मनमुराद आनंद लुटला. विजया गायकवाड यांनी प्रास्ताविक व ज्योतिर्मयी सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. प्रियंका बाविस्कर, दिपाली सोनवणे, राजश्री पाटील, तृप्ती खैरनार, नीता पाटील आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांची संवाद साधून खरेदी- विक्री करण्याचे महत्त्व पटवून दिले.





