
अमळनेर :- महिला पतंजली योग समिती अमळनेर मार्फत दि.२२ ते २४ जानेवारी रोजी भव्य मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

यात हृदय रोग,उच्च रक्तदाब, कंबर दुखी,एकाग्रता वाढविणे,संधिवात,मधुमेह आणि इतर रोग निवारण करण्यासाठी महिला,पुरुष व युवक युवतींसाठी मोफत योग शिबिराचे आयोजन दि.२२ ते २४ जानेवारी रोजी सकाळी ५:३० ते ७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला असून सदर योग शिबिराचे उद्घाटन आमदार अनिल पाटील यांच्याहस्ते होणार असून या शिबिरास खासदार स्मिता वाघ,जिप सदस्या जयश्री पाटील,योगरत्न पुरस्कार प्राप्त संजीवनी माने,महानंदा पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.





