![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2025/01/image_editor_output_image1116955925-1737687043289-scaled.jpg?fit=1024%2C988&ssl=1)
पालकांसह ग्रामस्थांनीही सहभागी होत खाद्यपदार्थांचा घेतला आस्वाद…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील जि.प.प्रा.मुलींची शाळेतर्फे बाल आनंद मेळावा २२ रोजी विठ्ठल मंदिराच्या आवारात आयोजित करण्यात आला होता. यावेळी मेळाव्यात पालकांसह ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.
![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2024/12/gif_1734710466943-1.gif?resize=640%2C768&ssl=1)
या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच आशाबाई पवार, उपसरपंच भिकन पाटील, शा.व्य.स.अध्यक्ष ललिता साळुंखे, श्रीमती अनिता साळुंखे यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.मा. जि.प.सदस्य शांताराम साळुंखे, हरिभाऊ मारवडकर, ग्रा.पं. सदस्य सचिन साळुंखे, ग्रा.पं. सदस्य उज्वला पाटील, शिवपुराण समितीचे सदस्य तसेच सर्व ग्रामस्थ बंधू-भगिनी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांना व्यवसायिक शिक्षण मिळावे म्हणून खाद्यपदार्थांची मेजवानी विद्यार्थ्यांनी पालकांच्या सहकार्याने बाल आनंद मेळाव्यात सादर केल्या. यात प्रामुख्याने भेळ,शेंगदाणा लाडू, इडली, बटाटा पोंगे, हलवा, पाणीपुरी, खमंग ढोकळा असे अनेक खमंग पदार्थ ठेवण्यात आले. या मेळाव्यास शिवपुराण समितीचे सर्व सदस्यांचे अनमोल सहकार्य लाभले.
![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2025/01/image_editor_output_image1945045255-17373389785377574354205967647335.jpg?resize=640%2C815&ssl=1)