![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2025/01/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3.png?fit=1024%2C576&ssl=1)
अमळनेर:- तालुक्यातील अमळगाव येथील ग्रामपंचायत कामाची तात्काळ चौकशी करा, अन्यथा आमरण उपोषण करणार प्रविण काशिनाथ चौधरी यांनी निवेदनातून असा इशारा दिला आहे.
![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2024/12/gif_1734710466943-1.gif?resize=640%2C768&ssl=1)
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव यांनी गटविकास अधिकारी यांना तात्काळ चौकशी अहवाल दाखल करण्याबाबत आदेश केले असताना चौकशी पूर्ण न करता चौकशीत दिरंगाई करीत असल्याचे प्रवीण चौधरी यांनी म्हटले आहे.ग्रामपंचायतीत केलेल्या भ्रष्टाचाराचे कागदोपत्री पुरावे दाखल केलेले आहेत. यापुर्वी वस्तुनिष्ट केलेली चौकशी ही अपूर्ण तसेच सुस्पष्ट नसल्यामुळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव यांनी सदर बाबतीत सुस्पष्ट अहवाल दाखल करणेबाबत गट विकास अधिकारी यांना आदेश केलेले आहे. परंतु मुदत उलटुनही सदर प्रकरणात कोणतीही चौकशी केलेली नाही. चौकशीत दुर्लक्ष करीत असल्यामुळे मला नाईलाजास्तव आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसावे लागेल असा इशारा निवेदनातून प्रवीण काशिनाथ चौधरी यांनी दिला आहे. तातडीने चौकशी अहवाल सदर प्रकरणाचा दाखल करावा अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु होईल अशा आशयाचे निवेदन त्यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती अमळनेर , जिल्हाधिकारी जळगाव, उपविभागीय अधिकारी अमळनेर, पोलीस निरीक्षक अमळनेर, तहसीलदार अमळनेर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मारवड यांना दिले आहे.
प्रतिक्रिया
गटविकास अधिकारी यांना तात्काळ चौकशी अहवाल दाखल करण्याबाबत आदेश केले असताना चौकशी पूर्ण न करता चौकशीत दिरंगाई केली आहे. 26 जानेवारी रोजी आमरण उपोषण करणार – प्रवीण चौधरी (अमळगाव)
प्रवीण चौधरी यांनी 26 जानेवारी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यांना वस्तूनिष्ठ चौकशी करण्यात येईल असे पत्र दिले आहे. – एन. आर. पाटील, गटविकास अधिकारी
![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2025/01/image_editor_output_image1945045255-17373389785377574354205967647335.jpg?resize=640%2C815&ssl=1)