
अमळनेर:- तालुक्यातील पिंपळी गावाचे मराठी शाळेचे जुन्या पडीक इमारतीत ३ अजगर प्रत्येकी ८ फूट लांबीचे वजन प्रत्येकी ९ किलो वजनाचे मिळून आले. अमळनेर तालुक्यातील एकाच ठिकाणी ३ अजगर प्रजातीचे साप मिळून आल्याची पहिलीच घटना आहे. पहीला अजगर निखील शेखर पाटील अमळगांव यांनी रेस्कु केला. त्यानंतर काही वेळातच पुन्हा सर्प मित्र अविनाश परमार,गणेश शिंगारे , दिपक चव्हाण यांनी रेस्कु केलेत. त्यानंतर त्यांनी अमळनेर शहरातील सर्पतज्ञ प्रभाकर भामरे सहा फौजदार सेवानिवृत्त यांना बोलाविले त्यांनी अजगराची बारकाईने तपासणी केली त्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी यांचे आदेशानुसार वनपाल पी जे सोनवणे , वनरक्षक रामदास वेलसे’ सहा फौज. सेवानिवृत्त प्रभाकर भामरे व सहकारी यांनी अजगर प्रजातीचे साप दोन मादी एक नर जातीचा साप यांना नैसर्गिक अधिवासात सोडले. प्रभाकर भामरे यांनी सांगितले की अजगर हा साप ३२ वर्षापर्यंत जगू शकतो त्यांची लांबी २० ते २२ फूटापर्यत राहते तो ससा पासून हरीणापर्यत प्राण्यांना गिळंकृत करू शकतो. वन्य कायदयाच्या शेडयूल एक मध्ये मोडत असल्याने शक्यतोवर सर्पमित्रांची मदत घ्यावी व जगा आणि जगू द्या व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत करा असे आवाहन केले आहे.




