
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 25 जानेवारी 2025 रोजी ‘राष्ट्रीय मतदार दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सकाळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांच्या अध्यक्षतेखाली मतदार शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. डॉ.माधव वाघमारे यांनी केले सर्व उपस्थिताना कु. नाजमीन खान पठाण हीने मतदार दिनानिमित्त शपथ दिली. त्यानंतर रांगोळी स्पर्धा पोस्टर्स स्पर्धा आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.




