
अमळनेर : १ जानेवारी २०२४ ते ४ मार्च २०२५ दरम्यान सरपंचपदाची मुदत संपणाऱ्या १३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण ३० रोजी सकाळी ११ वाजता नगरपरिषदेच्या सभागृहात काढण्यात येणार आहे.
तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक , दहिवद , दहिवद खुर्द , कुर्हे खुर्द , मालपूर , खडके , लोण सीम , लोण बुद्रुक ,तळवाडे , निसर्डी ,धार , रणाईचे बुद्रुक ,रणाईचे खुर्द या १३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची मुदत संपल्याने आता नव्याने आरक्षण काढण्यात येणार आहे.
तरी ग्रामस्थांनी ३० रोजी आरक्षण सोडतीसाठी नगरपरिषदेच्या सभागृहात उपस्थित रहावे असे आवाहन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी केले आहे.





