
मंगरूळ येथे प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते दिले ओळख क्रमांक
अमळनेर : केंद्र शासनाच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ऍग्रीकल्चर अंतर्गत ऍग्रीस्टॅक प्रकल्प गतीने सुरु झाला असून २६ रोजी प्रजासत्ताक दिनी अमळनेर येथे शासकीय ध्वजारोहण प्रसंगी आणि मंगरूळ येथे प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते ओळख क्रमांक देण्यात येऊन त्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा उपस्थित होते.

यापुढे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच केंद्र शासन आणि राज्यशासनाच्या सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी शेतकऱ्याला ओळख क्रमांक हा मूलभूत घटक असणार आहे. पी एम किसान अनुदान , शेतकऱ्यांना पीक कर्ज व किसान क्रेडिट कार्ड , पीक विमा आपत्ती व्यवस्थापन, किमान आधारभूत किमतीवर खरेदीमध्ये नोंदणीसाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असेल.
अमळनेर येथे शासकीय ध्वजारोहण उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार अनिल पाटील , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा ,जेष्ठ साहित्यिक कृष्णा पाटील , सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सोनवणे , नायब तहसीलदार कुलकर्णी , नायब तहसीलदार प्रशांत धमके ,राजेंद्र ढोले , गटविकास अधिकारी एन आर पाटील, पोलीस निरीक्षक विकास देवरे , मुख्याधिकारी तुषार नेरकर , पुरवठा निरीक्षक रूकसाना शेख , ऍड तिलोत्तमा पाटील हजर होते.
यावेळी वासुदेव एकनाथ भोई , पंढरीनाथ तुळशीराम पाटील ,रियाज गुलाब बागवान , साहेबराव दगा पाटील ,भाऊसाहेब गोविंदा पाटील यांचा तर मंगरूळ येथे देखील पाच शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात ओळख क्रमांक व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. मंगरूळ येथे सरपंच समाधान पारधी , श्रीकांत पाटील ,ग्रामविस्तार अधिकारी संजीव सैंदाणे ,तलाठी ए बी सोनवणे , तलाठी महेश पाटील , धनराळे ,कोतवाल भटू पाटील हजर होते.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निबंध , पथनाट्य , वक्तृत्व , चित्रकला , घोषवाक्य ,रांगोळी स्पर्धा विजेते व स्पर्धा घेणारे महाविद्यालय प्रताप महाविद्यालय , पंडित नेहरू समाजकार्य महाविद्यालय , रुख्मिणीताई महिला महाविद्यालय , धनदायी महाविद्यालय ,एन एम पाटील महाविद्यालय , शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचा देखील गौरव करण्यात आला.
१०० टक्के धान्य वाटप , ई के वाय सी , आधार अपडेट करणाऱ्या माऊली बचत गट , कष्टकरी महिला बचत गट , इंदिरा गांधी सोसायटी , सुरेखा पाटील, बालाजी महिला गट ,भागवत जाधव , सुनील वाणी या रेशन दुकानदारांचा देखील प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
शेतकऱ्यांनी शासनाच्या सर्व योजनांचा मुदतीत अडठलं येता लाभ मिळवण्यासाठी ऍग्रिस्टॅक योजनेंतर्गत ओळख क्रमांक काढून घ्यावा असे आवाहन नितीनकुमार मुंडावरे यांनी केले आहे. सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले. सानेगुरुजी कन्याशाळेच्या मुलींनी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले.