
अमळनेर : धुळे रस्ता ते पिंपळे रस्त्याला जोडणारा डीपी रोड सव्वा महिना खोदून पडला आहे. रस्त्याचे काम थांबल्याने नागरीकांना त्रास होत आहे. रस्त्याचे काम लवकर सुरू करण्याची मागणी होत आहे.
किरकोळ अपघात टाळून वाहतूक सुरळीत करण्यासाठी आमदार अनिल पाटील यांनी सुमारे सव्वा तीन कोटींचा डीपी रस्ता मंजूर केला आहे. रस्त्याचे काम सुरू झाले. खोदकाम झाले हार्ड मुरूमचा बारीक थर टाकला. मात्र काम थांबल्याने नागरिकांना त्रास होत आहे. लहान मुलांना सायकली हातात उचलून रस्ता ओलांडावा लागत आहे. अनेक ठिकाणी भुयारी गटारीच्या चेंबर चे पाईप तुटले आहेत. नागरिकांचे आऊट लेट चे पाणी रस्त्यावर वाहून दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.




