
अमळनेर : शेत शिवारातील ठिबक साहित्य बनवण्याच्या कंपनीतून ५३ हजार ५०० रुपयांची मशिनरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना ११ रोजी घडली.
जानवे येथील कृष्णा साहेबराव पाटील यांचे गट नम्बर ७२/२ब मधील शेतात ठिबक साहित्य बनवण्याची कंपनी असून तेथे पत्र्याचे शेड उभारले आहे. ११ रोजी रात्री ते पत्र्याचे शेड मध्ये लाईट सुरू करून बाजूला असलेल्या पोल्ट्री शेड मध्ये जाऊन झोपले. १२ रोजी सकाळी त्यांनी शेड पाहिले असता अज्ञात चोरट्याने दरवाजाचे स्क्रू उघडून गोडाऊन चा पत्रा उचकाऊन तेथील २० हजार रुपये किमतीचे ७ एच पी ची कॉम्प्रेसर मोटर , १० हजार रुपये किमतीची ३ एच पी ची मोटार , १० हजार रुपये किमतीचा वजन काटा , ७ हजार रुपयांची केबल , साडे तीन हजार रुपयांचे टी व्ही चे साहित्य , ३हजार रुपयांचे खोल फिटिंग चे पाने असे सुमारे ५३ हजार रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे उघडकीस आले. कृष्णा पाटील यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 334(२) ,३०५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.




