
अमळनेर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेशयात्रा १४ रोजी सायंकाळी अमळनेर शहरात दाखल
झाली. यावेळी अनेकांनी कलशाचे दर्शन घेतले. भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने झालेल्या संदेश भूमीचा प्रचार, प्रसार
व्हावा म्हणून संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती तसेच धुळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संदेश भूमी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने त्यागमूर्ती रमाई आंबेडकर स्मारक (वरळी, मुंबई) ते चैत्यभूमी दादर (मुंबई) तसेच डॉ. बाबासाहेब संदेश भूमी (धुळे) अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा अमळनेर येथे सायंकाळी पोहोचली. येथे एबी ग्रुप तर्फे स्वागत करण्यात आले.
सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास चोपडा नाका येथे विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रेचे आगमन झाले. तेथून ही यात्रा समाज बांधवांच्या उपस्थितीत फरशी रोड, बोद्ध विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चोक, गुड बाजार, बस स्थानक मार्गे अत्यंत शांततेत रस्त्यावर फुलांची उधळण करत यात्रा साने गुरुजी शाळेच्या प्रांगणात अस्थिकलश ठेवून उपस्थितांनी दर्शन घेतले. यावेळी अस्थिकलश यात्रेत सर्वच समाजातील मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




