
अमळनेर:- तालुक्यातील खेडी बु. येथील जिल्हा परिषद शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जि.प.प्राथमिक शाळा खेडी बु.येथे श्रीछत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटन, प्रतिमापूजन गावातील एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेले दिनेश साहेबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच या कार्यक्रमास शा.व्य. समिती अध्यक्ष व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, मारवड केंद्राचे केंद्र प्रमुख अशोक सोनवणे,मुख्याध्यापक,युवा प्रशिक्षणार्थी, अंगणवाडी सेविका ,पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक भारती चौधरी व आभार प्रदर्शन शिक्षणप्रेमी राकेश पाटील यांनी मानले.गावातील तरुण वर्ग यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी सहकार्य केले.




