
अमळनेर:- तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे खुर्द मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक गावाचे तंटामुक्त अध्यक्ष निंबा दला चौधरी, लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. ग्रामपंचायत सदस्य संतोष बापू चौधरी, अरुण संभाजी पाटील, सुदाम बळीराम पाटील, लोटन रूपचंद भिल ग्रामसेवक किरण लंकेश, शिपाई सुनील मुरलीधर पाटील, रोजगार सेवक संतोष पाटील, पुरुषोत्तम चौधरी ,जयवंत पाटील, साहेबराव पाटील ,गोकुळ पाटील,गोविंदा चौधरी, राजेंद्र पाटील यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले.




