
अमळनेर:- तालुक्यातील झाडी येथील तीनशे वर्षांपूर्वीचे पुरातन जागृत देवस्थान श्री ममलेश्वर महादेव मंदिर संस्थान येथे 26 फेब्रुवारी l बुधवार रोजी महाशिवरात्रीनिमित्त यात्रोत्सव होणार आहे तरी सर्व झाडी पंचक्रोशीतील शिवभक्तांनी यात्रेत येऊन श्री ममलेश्वर महादेवांचा दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर संस्थान च्या वतीने करण्यात आले आहे.
यात्रेत विविध प्रकारचे दुकाने, हॉटेल्स लहान मोठ्यांसाठी पालखी, झुले अजून भरपूर काही मनोरंजन असणार आहे. 25 फेब्रुवारी रोजी गावातील व परिसरातील महिलांची भव्य जल कलश यात्रा व महिलांचा आनंद उत्सव मेळावा व रांगोळी स्पर्धा देखील होणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता भव्य ध्वज मिरवणूक होळी चौकातून निघणार आहे ध्वज मिरवणूक डीजेच्या तालावर वाजत गाजत देव बल्ली परिसरात येईल व ममलेश्वर महादेव मंदिरावर ध्वज लावण्यात येईल तसेच ध्वज लावल्यावर महादेव मंदिरावर अभिषेक करण्यात येईल आणि मंदिर परिसरात पंकज रवींद्र दुसाने (पी एन ज्वेलर्स सराफ) यांचे स्पार्क फाउंडेशन अमळनेर इतिहासाचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेले भव्य दिव्य ऐतिहासिक शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचा कार्यक्रम दिनांक 26 फेब्रुवारी 2025 ते दिनांक 27 फेब्रुवारी 2025 सुरू राहणार आहे. 26 संध्याकाळी आठ वाजे पासून ते रात्री दहा वाजेपर्यंत खान्देशातील सुप्रसिद्ध कीर्तनकार रविकिरण महाराज दोंडाईचेकर यांचे जाहीर कीर्तन होणार आहे. 27 रोजी संध्याकाळी आठ वाजता गावातील आजी-माजी फौजी यांना वीर गौरव पुरस्कार ममलेश्वर महादेव संस्थान यांच्या तर्फे देण्यात येणार आहे तरी कार्यक्रमास येऊन सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन झाडी ग्रामस्थ व मंदिर संस्थान यांच्याकडून करण्यात आले आहे.




