
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या शानदार प्रदर्शनाला पालकांसह ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर दाद देत बक्षिसांची उधळण केली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लोक नियुक्त सरपंच आशाबाई सुभाष पवार ह्या होत्या. कार्यक्रमास मा.जि.प.सदस्य शांताराम साळुंखे, उपसरपंच भिकन पाटील,केंद्रप्रमुख अशोक सोनवणे,माजी केंद्रप्रमुख दत्तात्रय बाविस्कर, हरिभाऊ मारवडकर, माजी प्राचार्य एल.जे.चौधरी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ललिता विजय साळुंखे, सीमा दिनेश साळुंखे ग्रामपंचायत सदस्या बी.डी.पाटील, समाधान सुभाष शिंदे, शेखर अशोक साळुंखे, उमाकांत बोरसे, सुभाष पवार, सुधीर चौधरी,मारवड विकास मंचचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एल.जे.चौधरी व केंद्रप्रमुख सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमात एकूण 25 गाण्यांवर शानदार नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले.तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित नाटिका शालेय विद्यार्थ्यांनी सादर केली. या नाटिकेस प्रेक्षकांचा अतुलनीय प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमास सुनील प्रभाकर साळुंखे यांनी शिक्षण महर्षी कै. रावसाहेब मोतीराम माधवराव साळुंखे (संस्थापक अध्यक्ष ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड) यांच्या स्मरणार्थ प्रथम तीन नृत्यास ट्रॉफी दिली. तसेच रामचंद्र मंगा मोरे यांचे सुपुत्र सुरेश रामचंद्र मोरे (जिल्हा परिषद शिक्षक) यांनी कार्यक्रमास सर्व 70 विद्यार्थ्यांना थ्री-इन-वन एक वही व लेखन साहित्य भेट दिले. दात्यांचे शाळेच्या वतीने आभार मनात ऋण व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमात प्रथम नृत्य क्रमांक नम्रता संतोष सूर्यवंशी (इयत्ता चौथी) द्वितीय नृत्य क्रमांक दिव्यांनी समाधान शिंदे (इयत्ता तिसरी) तृतीय नृत्य क्रमांक तेजस्विनी विजय गांगुर्डे यांना कबड्डी खेळाडू करण साळुंखे व केंद्रप्रमुख अशोकजी सोनवणे आणि मान्यवर यांच्या हस्ते ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि लेखन साहित्य व वह्या वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास ग्रामस्थांकडून तेरा हजार पाचशे रुपये बक्षीस म्हणून मिळाले.सर्व दातांचे आभार व ऋण व्यक्त करण्यात आले.कार्यक्रमास महिला व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रस्तावना उपशिक्षक दिनेश मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी साठी मुख्याध्यापिका श्रीमती मनीषा निकम, श्रीमती शारदा जाधव उपशिक्षक, युवा प्रशिक्षणार्थी सुदीप साळुंखे, संजू पवार यांचे सहकार्य लाभले. आभार प्रदर्शन सुदीप साळुंखे यांनी केले.

