
महाशिवरात्री पासुन पंधरा दिवस चालणारा खान्देशातील मोठा यात्रोत्सव
अमळनेर:- धुळे व जळगाव जिल्ह्याच्या सरहद्दीवर खान्देश गंगा सुर्यकन्या तापी व पांझरा नदीच्या संगमावर दक्षिण तीरावर हजारो वर्षांची परंपरा असलेले पुरातनकालीन , जागृत व नवसाला पावणारे स्वयंभू त्रिपींडी “श्रीक्षेत्र कपिलेश्वर महादेवाचा खान्देशातील मोठा पंधरा दिवसीय यात्रोत्सवला उद्या महाशिवरात्री पासुन सुरुवात होत आहे, तर महाराष्ट्रात पहिले अखिल भारतीय संत संमेलन श्त् श्रीक्षेत्र कपिलेश्वर येथे महामंडलेश्वर स्वामी हंसानंद महाराज यांनी भरविल्या पासुन विविध धार्मिक विधीला येथे मान्यता मिळाल्या पासून खान्देश सह परप्रांतातून ही भाविक यात्रोत्सव काळात येऊन पितृशांतीसह विविध तर्पण विथी व दर्श अमावस्येला याच दिवशी सुरुवात होत असल्याने रात्री धुळे जळगाव जिल्ह्यातील निरंकारी भजनी मंडळाकडून शिवरात्रीचा जागर महाशिवरात्री पर्वा निमित्त सलग १५ दिवस करतात. तसेच दुसर्या दिवशी अमावस्या असल्याने मांत्रिक- तांत्रिक रात्री तापी स्नान करतात व सवाद्य कपिलेश्वराचे दर्शन घेतात. विविध धार्मिक ग्रंथात उल्लेख असलेल्या श्रीक्षेत्र कपिलेश्वर येथे पुरातन काळापासून तप, यज्ञकर्म, आदींची कपिलमुनींनी येथे सुरूवात करून दीर्घकाळ तपश्चर्या व योगसाधना केली त्या वेळी कपिला नावाची गाय कपिलमुनींजवळ येत असे व योगसाधना होईपर्यंत कपिलमुनींशेजारी बसत होती त्यावरून ” श्रीक्षेत्र कपिलेश्वर” मंदिरातील त्रिपींडी महादेवाच्या मुर्त्याची स्थापना केल्याचा इतिहास मंदिर परिसरात शिलालेखावरून आढळतो हे शिलालेख संस्कृत व मोडी भाषेतील लिपीत दिपमाला व मंदिराच्या तटरक्षक भिंतीवर लिहीलेले आज ही आहेत.
१७ व्या शतकात थोर समाजसेविका अहिल्याबाई होळकर यांनी कपिलेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा शिललेखासह मंदिराच्या हेमांड पंथीय आकर्षक व विलोभनीय बांधकाम १६ व्या शतकात झाल्याचे शिलालेख येथे आज हि दिसतात. मंदिर पूर्ण काळ्या पाषाण दगडांनी हेमांडपंथी पध्दतीने बांधले आहे तर १८ दगडी खांबावर मोठा सभामंडप व त्यावर तीन घुमट व एक मध्यभागी गाभारा व मुख्य घुमट असे पूर्वाभिमुख मंदिर व समोरेच २१ फूट उंच दगडी दीपमाळा आहे, तर सूर्यकिरण दररोज थेट पीडिवर येऊन दर्शन घेतात हा विलक्षण क्षण काहीकाळच भक्तांना अनुभवता येतो,मंदिराचे डाव्या हाताला श्रीराम मंदिर, समोरच हनुमान मंदिर, उजव्या हाताला कुलस्वामिनी आशापुरी मंदिर, मंदिर पायथ्याशी तापिनदीचे व पांझरा नदीचे सगमस्थळ असा विलोभनीय व निसर्गरम्य परिसर असल्याने मोर व लांडोर,हरीण यांचा ही संचार असल्याने रस्त्यावर दऱ्या खोऱ्यात सहज दिसतात त्यात मंदिराच्या दोन्ही बाजूला तापी- पांझरेचे पाणी व मुडावद व कपिलेश्वर तीरावर एकूण २५ नौकातुन फक्त १० रुपयात नौकानयनचा आनंद भाविक घेतला , धुळे जिल्ह्यातील शिरपूर व शिंदखेडा भागातुन भावीक दर्शनासाठी येतात मात्र येथे खोल डोह असल्याने खबरदारी घेतली जाते. मंदिर शेजारी अनिरुद्ध बापूचा आश्रम असल्याने सद्गुरू भक्त परिवार मुंबई व बाहेर राज्यातून ही भाविक महाशिवरात्रीला कपिलेश्वर दर्शनासाठी येतात ,
यात्रोत्सव काळात अमळनेर आगारातून थेट कपिलेश्वर मंदिर पर्यत बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर शिंदखेडा व शिरपुर येथुन ही पलीकडील मुडावद व भोरटेक पर्यंत खाजगी वाहने प्रवाशांना सेवा देणार आहे. तसेच खाजगी वाहन ही मंदिरापर्यंत जाण्यासाठी थेट पक्का डांबरी रस्ता आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मारवड व बेटावद पोलीस ठाण्याचे महिला व पोलीस कर्मचारी भाविकांना मार्गदर्शन व गर्दीवर १५ दिवस नियंत्रण ठेवतील ,मंदिर संस्थानने भाविकांचे सुलभ दर्शन होण्यासाठी महिला स्वयंसेवक ही मदत करणार आहेत.
गेल्या दोन तीन वर्षापासून कपिलेश्वर मंदिर संस्थानचे पदाधिकारी हे तालुक्यातील गावागावात जाऊन वर्गणी गोळा करून मंदिर परिसरात संरक्षण भिंत व भक्तनिवास सह विविध विकासकामे करीत आहेत यात भाविकांना कपिलेश्वर महात्म्य कळावे म्हणून विविध मान्यवरांच्या उपस्थित कपिलेश्वर मंदिरस्थळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून महामंडलेश्वर हंसानंदतीर्थ महाराज स्वतः कपिलेश्वर महात्म्य सांगणार आहे व सव्वा महिना अखंड रामधूनची सुरुवात ही करणार आहे, त्रिपिंडी कपिलेश्वर शिवलिंगाचा अभिषेक महामंडलेश्वर हंसानंदतीर्थ महाराज व माजी मंत्री अनिल पाटील हे सपत्नीक कपिलेश्वराची व तापी आरती करून करतील,तर महाशिवरात्री निमित्ताने मंदिरावर रंगीबेरंगी आकर्षक विद्युत रोषणाई, भक्तासाठी होम हवन,विविध धार्मिक विधीसाठी तीन ठिकाणी मंडप, वाहन पार्किंग व भाविकांना दर्शन सुलभ घेता यावे म्हणून दर्शनरांगेची व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे,
पाडळसरेत महाशिवरात्री निमित्त सत्यनारायण पुजन तर खौशीत चार महिन्यातून उघडणार शिव परिवाराचे मंदिर…
पाडळसरे येथील द्वादश ज्योतिर्लिंगाची स्थापना असलेल्या प्राणेश्र्वर मंदिरात सालाबादप्रमाणे महाशिवरात्रीला अभिषेक होऊन सत्यनारायण पुजन त्रिमूर्ती निर्वाण ट्रस्ट तर्फे करण्यात येणार असून प्रसाद वाटत होईल तर खौशी येथील गणेश, शिव- पार्वती व कार्तिक स्वामी मुर्त्यांचे “शिव परिवार ” मंदिर हे भाविकांना चार महिन्यांत एक वेळाच महाशिवरात्रीच्या दिवशी पूर्ण दिवस भाविकांसाठी दर्शनासाठी उघडत असल्याने परिसरातील भाविक मोठी गर्दी या ठिकाणी दर्शनासाठी करतात .

