
अमळनेर :- शहरातील दगडी दरवाज्यासमोर असणाऱ्या बाजारपेठ गल्लीत नेहमी अवजड वाहनांची गर्दी असते.मात्र हे वाहने रस्त्यावर बेशिस्त पणे लावले जातात.त्यामुळे याठिकाणी वाहतुकीची कोंडी नेहमी होतांना दिसते.
बाजारपेठेत सर्व होलसेल किराणा व भुसार माल विक्री दुकाने असल्याने याठिकाणी माल ने आण करण्यासाठी नेहमी शहराबाहेरील व परराज्यातील अवजड वाहने आलेली असतात.माल खाली करण्यासाठी ही वाहने रस्त्याच्या बाजूला बेशिस्त पणे लावली जात असल्याने इतर वाहनांना जायला जागा मिळत नाही. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते.




