
ऐन बहारावर आलेल्या पिकांना पाण्याची कमतरता, विकत टँकर आणून पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
अमळनेर :- तालुक्यातील काही गावांची भूजल पातळी मोठया प्रमाणात खालावल्याने रब्बी हंगामात पेरलेल्या पिकांना पाण्याची अपूर्णता पडत असल्याने एन बहारावर आलेल्या पिकांना पाणी टंचाई ची समस्या जाणवत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.
तालुक्यातील मंगरूळ,शिरूड,कावपिंप्री,इंद्रापिंप्री,जानवे, रणाईचे,डांगर,चोपडाई-कोंडावड,वाघोदे,निसर्डी,खडके,पिंपळे,जवखेडे, अंचलवाडी तसेच परिसरातील गावे ही टंचाईग्रस्त गावे आहेत.या भागात पावसाचे पाणी अडविण्यासाठी कोणताही मोठा,मध्यम प्रकल्प नसल्याने ह्या परिसरात नेहमी पाणी टंचाईच्या झळा लवकर जाणवू लागतात.त्यामुळे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात विहिरींची भूजल पातळी खालावल्याने रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकांना टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत.
ह्या वर्षी अतिपावसामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.त्याची कसर काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू,ज्वारी,बाजरी,मका,हरभरा,कांदा आदी पिकांची लागवड केली होती.ज्यांनी रब्बीची पेरणी लवकर केली होती.त्यांचे उत्पन्न आले.मात्र ज्या शेतकऱ्यांची रब्बीची पेरणी उशिरा केली.त्यांचे उत्पन्न मात्र पाण्याअभावी हाताचे जाणार असून आर्थिक नुकसान होणार असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.
काही शेतकऱ्यांची रब्बी हंगामात मका पिकाची पेरणी उशिरा केली होती.त्यांना शेवटच्या तीन ते चार पाण्यासाठी हातात येणारे उत्पन्न वाया जाऊ नये. निसलेला मक्याचे उत्पन्न वाया जाऊ नये म्हणून कमी भावात दुग्ध जनावरांसाठी चारा विकून आर्थिक भार कमी करून घेत आहेत.त्यामुळे परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर ओला मका पिकांचा चारा दुग्ध व्यवसायिक शेतकऱ्यांना देत आहेत.यामुळे मका पीक येणार नसले तरी मात्र शेतकरी चाऱ्याची विक्री करून आर्थिक नुकसान टाळत आहेत.




