
रात्रीच्या वेळी घडणाऱ्या अवैध प्रकारांना बसणार चाप
अमळनेर-येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाशेजारील स्केटिंग ट्रॅक न्यू प्लॉट परिसर विकास मंचच्या मागणीनुसार पालिकेच्या विद्युत विभागाने प्रकाशमय केल्याने गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी घडणाऱ्या अवैध प्रकारांना बसणार चाप बसणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून याठिकाणी पथदिवे नसल्याने नको ते प्रकार करणाऱ्यांची चंगळ होत होती तसेच याठिकाणी पुरातन शिवालय मंदिर असताना सायंकाळच्या वेळी दर्शनासाठी येणाऱ्या महिलांना भीती निर्माण झाली होती आता महाशिवरात्री निमित्त या मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम असल्याने स्केटिंग ट्रॅक वर ठिकठिकाणी पथदिवे लावून हा रस्ता प्रकाशमय करावा अशी मागणी न्यू प्लॉट परिसर विकास मंचचे अध्यक्ष चेतन राजपुत यांनी मुख्याधिकारी तुषार नेरकर व विद्युत अभियंता कुणालकुमार महाले यांच्या कडे केली होती त्यांनी लागलीच तीन ठिकाणी पथदिव्याची व्यवस्था करून हा रस्ता प्रकाशमय केल्याने न्यू प्लॉट विकास मंच सह नागरिक,महिला भगिनी व भाविकांनी पालिकेचे आभार व्यक्त केले आहेत.

