
अमळनेर:- येथील जायन्ट्स ग्रुप ऑफ विरांगणा सहेली ग्रुपच्या माजी अध्यक्षा दिपिका सोनवणे यांची पुनश्च सहेली ग्रुपचे अध्यक्ष म्हणून निवड झाली व नवीन कार्यकारणी करण्यात आली.
मागील वर्षी एकूण 32 समाजोपयोगी उपक्रम घेण्यात आले त्यात अंबऋशी टेकडीवर केतकी कंद लागवड, वृक्षारोपण, स्त्री सुरक्षितता व्याख्यान,मोफत आठ दिवस योग शिबीर, धनदाई एज्युकेशन सोसायटी येथे डॉ.मयुरी पाटील यांचे किशोरवयीन मुलींसाठी व्याख्यान,विजय नाना आर्मी स्कूल येथे योग शिबीर,एक हात मदतीचा अंतर्गत 1500 कपडे वाटप,साने गुरुजी स्मारकाला 5000 रुपये देणगी,पिंगळवाडे शाळा येथे 100 एक पुस्तकं एक पणती वाटप,मारवड व अमळनेर येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत जनजागृती, ममता विद्यालयातील विद्यार्थ्यांना जेवण,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुर्द येथे महिला दिनानिमित्त व्याख्यान, मोफत जलपात्र वाटप,तांबेपुरा येथे चित्रकला स्पर्धा,55 विद्यार्थ्यांकडून एक पेड माँ के नाम उपक्रम भगिनी मंडळ येथे गुड टच बॅड टच आणि मोबाईलचे फायदे दुष्परिणाम याच्यावर मार्गदर्शन,भिल्ल वस्तीत शरीर स्वच्छता व मासिक पाळी बद्दल मार्गदर्शन,प्लास्टिक मुक्त अभियान असे विविध उपक्रम घेण्यात आले. या वर्षी सुदर्शना राजमल पाटील व शोभा संभाजी पाटील यांची उपाध्यक्षपदी, कल्पना सदाशिव पाटील यांची सचिवपदी व दिपाली जितेंद्र धनगर यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. संचालक मंडळात सौ.उज्वला विजय निकुंभ,सौ.दर्शना स्वबल निकुंभ, डॉ.पूजा वाघुले पंजवाणी सौ.अनिता विनोद चौधरी,सौ.योगिता अजय पांडे हे असून, सौ.निलिमा राजेश सोनकुसरे,सौ.निलिमा राकेश माहेश्वरी,डॉ.मयुरी विक्रांत पाटील,सौ.सोनाली पंकज हाडेकर,सौ.अपेक्षा दिवाकर पवार,सौ. हर्षदा निलेश वाघ या नविन सहेली सदस्या आहेत. 24 फेब्रुवारी रोजी कार्यकारणी ठरवत दिपिका सोनवणे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लीलाताई यांचे आत्मचरित्र या पुस्तकांचे वाटप केले.यावेळी दर्शना ताई पवार यांनी महिलांशी हितगुज केली.माजी फेडरेशन अध्यक्ष संगीता पाटील यांनी मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.