
इसम गंभीर जखमी, मारवड पोलिसांत गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील बोहरा मारवड रस्त्यावर भरधाव चारचाकीने पायी जाणाऱ्यास पाठीमागून धडक दिल्याने इसम गंभीर जखमी झाल्याची घटना २६ रोजी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २६ रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास बोहरा – मारवड रस्त्यावर संजय रमेश भील (रा. बोहरा) हा मजुरीसाठी पायी जात असताना मारवडकडे जाणाऱ्या आर्टीका (क्र. एमएच ४७ एएन ५६७१) वरील चालक सुधीर विश्वासराव पाटील (रा. बोहरा) याने हयगयीने वाहन चालवत संजय याला पाठीमागून धडक दिली. तसेच पुढे जाऊन गाडी निंबाच्या झाडाला ठोकली. या अपघातात धडकेमुळे संजय फेकला जाऊन त्याच्या मानेला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यास अमळनेर येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी धुळे नेल्याचा सल्ला दिल्याने त्यास धुळे येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीचा भाऊ लक्ष्मण रमेश भील याच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत सुधीर विश्वासराव पाटील याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ संजय पाटील हे करीत आहेत.




