
अमळनेर:- शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय व साने गुरुजी कन्या हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने, ग्रंथपाल संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झालेले ग्रंथपाल मुकेश विष्णू पाटील यांचा सत्कार करण्यात आला व राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव दादासाहेब संदीप घोरपडे व प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत निकम हजर होते. यावेळी संस्थेचे मुख्याध्यापक प्रतिनिधी सुनिल पाटील यांनी प्रास्ताविक केले. सत्काराला उत्तर देताना मुकेश पाटील म्हणाले की, चांगली पुस्तके व चांगली माणसे वाचता आली पाहिजे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संदीप घोरपडे म्हणाले कि, नुकतेच साहित्य संमेलन झाले त्यात ग्रंथांची किमया अनेक किमयागारांनी दाखवली. आपल्याला सुद्धा समृद्ध ग्रंथालय निर्माण करून त्यातली पुस्तके वाचली पाहिजे. त्यासाठी आपले ग्रंथपाल कार्यतत्पर आहेत आपण त्यांचा फायदा घेतला पाहिजे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका अनिता बोरसे तर सूत्रसंचालन विलास चौधरी सर यांनी केले.




