
अमळनेर:- येथे आशांच्या सन्मानार्थ प्रोत्साहन मिळावे यासाठी आशा डे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी गिरीश गोसावी यांच्या सूचनेनुसार आशा डे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे कार्यक्रमाच्या उद्घाटक व अध्यक्षस्थानी खा.स्मिता वाघ होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षही भाषणात सांगितले की, आशांनी शासकीय कामकाज करत असताना स्वतःच्याही आरोग्या कडे लक्ष द्यावे व तसेच स्वतःच्या आवडीनिवडीसाठी सुद्धा वेळ घ्यावा असे त्यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात सांगितले. या कार्यक्रमाचा उद्देश दैनंदिन कामकाजातून आशांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आशा डे चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात रसीखेच, लिंबू चमचा, गायन स्पर्धा, ग्लास फेक, संगीत खुर्ची, प्रश्नमंजुषा आदी. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. वर्षभर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा सेविकांना खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. सदर कार्यक्रमाप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय रनाळकर, डॉ. साहिल चौधरी, डॉ.साक्षी बोरसे, तालुका आरोग्य सहाय्यक संजय पाटील, तालुका हिवताप परिवेक्षक प्रशांत फुगे, किशोर माळी आशा तालुका समूह संघटक, सर्व गटप्रवर्तक सिकल सेल कॉर्डिनेटर अनिता तडवी व सर्व आशा सेविका सदर कार्यक्रमास उपस्थित होते.




