
अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथील पांझरा व भात नदीच्या काठा वर व संगमावरती, भोलेनाथाचे व गणपतीचे प्राचीन मंदिर असून फार जागृत स्थान आहे. मांडळ येथील व्यापारी व पत्रकार सुरेंद्र जैन, यांच्या शिवशक्ती प्रतिष्ठान तर्फे, महाप्रसादाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त मंदिराचा बाहेरील भागात नंदीची व त्रिशूलाची स्थापना करण्यात आली. परिसरातील मांडळ,कंचनपूर, वालखेडा,डोंगरगाव, हेंकळवाडी, तामसवाडी, सर्व परिसरातून महाप्रसादाच्या व भंडाऱ्यासाठी भक्तगण, बंधू-भगिनी, बालगोपाल मंडळी, दर्शनासाठी व भंडार्यासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाला जिप सदस्या जयश्री पाटील, खासदार स्मिता वाघ, पावभा आप्पा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाटील, नंदुरबारचे नगरसेवक विलास रघुवंशी, शिंदखेडाचे पंकज कदम, योगेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य के डी पाटील, धुळे जिल्हा पत्रकार संघटनेचे ज्येष्ठ पत्रकार गोपी लांडगे, ज्येष्ठ पत्रकार विलास पाटील, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान मैराळे व
संपूर्ण सदस्य, पत्रकार यदुवीर पाटील, प्रल्हाद सर, अमळनेर मार्केटचे संचालक डॉ. अशोक पाटील, दीपक बडगुजर व सर्व कमिटी, व सर्व माजी सरपंच व उपसरपंच, कंचनपुर चे सरपंच मड्डू भाऊ पाटील , मांडळचे सर्व मित्र मंडळ, मांडळ आदर्श हायस्कूलचे चेअरमन तनेश कोळी, अमळनेरचे मेडिकल ग्रुप, शिरपूर व्यापारी ग्रुप, मापाडी ग्रुप, आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमांमध्ये भक्ती संगीत साठी, देवऋषी ग्रुपचे संजय गुरव अमळनेर, वाजंत्री सह भक्ती संगीताचा तीन तासापर्यंत कार्यक्रम चालला. कार्यक्रमाला आलेले राजकीय व पत्रकार क्षेत्रातील, व्यापारी, क्षेत्रातील आलेले पदाधिकारी, यांच्या शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. भाद्रेश्वर येथील महादेव मंदिर हे फार प्राचीन असून, ही पिंड फार खूप मोठी असून, प्राचीन आहे. ह्या पिंडीवर गणेश जी आणि कार्तिकी हे सुद्धा विराजमान आहेत, या मंदिरात गणेश जी भगवान यांची सुद्धा भव्य मूर्ती स्थापित आहे, ह्या गणेशाच्या मूर्तीवर सोबत रिद्धी आणि सिद्धी देवीच्या प्रतिमा आहेत. फार जागृत स्थळ आहे. या मंदिरासमोर फार मोठे भुयार आहे,तसेच हे मंदिर भात आणि पांझरा नदीच्या संगमावर आहे. लोक वर्गणी करून मांडळ व कंचनपूर ग्रामस्थांनी, साडेतीन क्विंटल चा 22 फुटी त्रिशुलाची नंदुरबारचे नगरसेवक विलास रघुवंशी यांच्या हस्ते स्थापना केली आहे.




