
सव्वा महिने मृत्यूशी दिलेली झुंज अखेर ठरली अपयशी
अमळनेर-मंगरूळ सेंट मेरी शाळेजवळ बस आणि मोटारसायकल मध्ये सामोरा समोर झालेल्या अपघातात पत्नी जागीच ठार झाली होती आणि पती गंभीर जखमी झाला होऊन कोम्यात गेले, होते,यातील पतीचा उपचारादरम्यान 28 रोजी दुर्देवी मृत्यू झाला.
समाधान रुपसिंग पाटील, (रा.खडके ता अमळनेर) असे मयत इसमाचे नाव असून अपघातात पत्नी अरुणा समाधान पाटील यांचे जागीच निधन झाले होते तर जखमी समाधान यांना डॉ अनिल शिंदे यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट केले होते, नंतर धुळे येथे पाठवण्यात आले होते. बरोबर सव्वा महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांनी प्राण सोडला.खडके येथे काल शोकाकुल वातावरणात त्यांच्या वर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार असून भैय्यासाहेब रुपसिंग पाटील यांचे ते मोठे बंधू होत.




