
अमळनेर : तालुक्यातील गडखांब ग्रुप ग्रामपंचायतीचा १०० टक्के घरपट्टी ,पाणीपट्टी कर भरणाऱ्या ग्रामस्थांना घरातील स्वच्छता विषयक वस्तू भेट स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला आहे. वसुली साठी ग्रामपंचायतीने अशी आगळी वेगळी तऱ्हा वापरत ग्रामस्थ हिताचा निर्णय हाती घेऊन प्रत्येक घरातील महिलांचा विचार करून घरातील स्वच्छता करण्यासाठी महिलांना जो त्रास होतो, त्यात बचाव करण्यासाठी जे नागरिक ग्रामपंचायतीचा १०० टक्के कर भरतील, त्यांना घर पुसण्यासाठी असणारे ‘मॉप मशीन’ मोफत देण्याची योजना आखली आहे. या योजनेतंर्गत गावांतील ग्रामस्थ सहकार्य करून १०० टक्के कर भरणा करत असून त्यांच्या घरातील महिलांना मॉप हे मशीन ग्रामपंचायतीकडून भेट स्वरूपात देण्यात येत आहे. या निर्णयाचे स्वागत होत असून ग्रामस्थांनी तत्काळ १०० टक्के कर भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करून वस्तूंचा लाभ घेण्याचे आवाहन सरपंच नितीन पाटील, उपसरपंच शांताराम पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक पवन कुंभार यांच्या कडून करण्यात आले आहे.




