
अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे येथील झुलाल भबूता चौधरी यांचा नातू – आदर्श माध्यमिक विदयालय, दोंदे कॉलनी देवपूर धुळे येथील वरिष्ठ लिपीक नगराज हिलाल महाजन व अनिता नगराज महाजन यांचा मुलगा दिपेश नगराज महाजन यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2023 च्या परीक्षेत मंत्रालय मुंबई येथे सहाय्यक कक्ष अधिकारी अराजपत्रित गट ब पदी यशस्वी निवड झाली. या अगोदर मागील महिन्यात कर सहाय्यक व महसुल सहाय्यक पदीही निवड झालेली आहे. सध्या सातारा जिल्हा परीषद मध्ये बांधकाम विभागात गट क संवर्गातून कनिष्ठ सहाय्यक लिपीक पदावर कार्यरत आहे. तसेच नगराज महाजन यांची मुलगी जागृती महाजन देखील कनिष्ठ अभियंता म्हणून पाटबंधारे विभाग, धुळे येथे कार्यरत आहे .
या निवडीबद्दल बापूसाहेब माळी गुरुजी शि.प्र. संस्थेचे अध्यक्ष मोहन दयाराम सोनवणे, कार्याध्यक्ष- भैय्यासाहेब राजीव पं. पाटील, सचिव- बाळासाहेब सुनिल ग. सोनवणे सर्व पदाधिकारी तसेच महात्मा फुले विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मिलींद सोनवणे, व सर्व पदाधिकारी तसेच संस्थेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व समाजातील सर्व स्तरातून त्याचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

