
आठ लाख तीस हजाराचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल…
अमळनेर :- शिरपूरहून अमळनेरला रेती टाकण्यासाठी आलेल्या डंपरवर अमळनेर पोलिसांनी कारवाई केली असून आठ लाख तीस हजाराचा मुद्देमाल जप्त करून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून अमळनेर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, नितीन कापडणे, अमोल कर्डीकर ,पोलीस कॉन्स्टेबल निलेश मोरे आदींच्या पथकाने गलवाडे रस्त्यावर रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास सापळा रचला असता शिरपूर येथील लोंढवे स्टोक यार्ड येथून पाच ब्रास अवैध रेतीची वाहतूक करणारे डंपर (क्र एम एच 19 सी वाय 2729) आढळून आले असून पोलिसांनी सदर वाहन ताब्यात घेऊन अमळनेर पोलीस स्थानकात जमा करण्यात आले असून वाहन चालक संतोष नाना बैसाणे रा.हिंगोणे ता.अमळनेर यांच्यावर कलम 303(2),48(7),48(8)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत.




