
सर्व धर्मीय सर्वपक्षीयांचा मूक मोर्चा…
अमळनेर:- वेश्याव्यवसाय माननीय उच्च न्यायालयाच्या ९ऑक्टोबर २४ च्या आदेशाप्रमाणे त्वरित बंद करा अन्यथा मुंबई उच्च न्यायालयाची संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध अवमान याचिका दाखल करणार यासाठी अमळनेर शहरात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
अमळनेर येथील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पासून दुपारी अडीच वाजता या मूक मोर्चाला सुरुवात झाली. सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले व कुराण पठण करून मोर्चा निघाला. उच्च न्यायालयाचे याचिका कर्ते व मोर्चाचे मुख्य समन्वयक रियाज शेख यांनी मोर्चाचे आयोजनाचे महत्त्व विशद केले. त्यानंतर भागवत अण्णा गुरुजी, सामाजिक कार्यकर्ता संदीप घोरपडे, सोमचंद सांधशिव, यशवंत बैसाणे, अरविंद बिऱ्हाडे, बाळासाहेब शिंदे, एडवोकेट अभिजीत बिऱ्हाडे , मनोज मोरे, काँग्रेसचे मनोज बापू , पाचोर्याचे अझर खान, एकता संघटनेचे फारुक शेख यांनी सुद्धा आपले आपले मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी कोणत्याही परिस्थितीत हा कुंटण खाना नागरी वस्तीतून स्थलांतर होणे आवश्यक आहे, या वस्तीमध्ये देह व्यापार करणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, काही राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांचा या व्यवसायास प्रत्यक्ष पाठिंबा असल्याचे त्यांच्या विरोधात सुद्धा कारवाई करण्यात येईल अशी मागणी करण्यात आली. उपविभागीय दंडाधिकारी नितीन मुंडावरे व सहाय्यक पोलीस अधीक्षक केदार बारबोले यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले.
निवेदन देताना फारुक शेख यांनी निवेदनाचे वाचन केले व प्रशासनाकडून काय अपेक्षा ते विधीत केले त्यावेळी फारुक शेख सह मोर्चाचे समन्वयक रियाज शेख, कुदरत अली सय्यद, यशवंत बैसाने, मनोज बापू , अजहर शेख, मनोज मोरे, शेर खान पठाण, आबीद अली सय्यद, आकिब अली सय्यद, अल्तमस शेख, मोईज अली, राजू शेख आदींच्या हस्ते देण्यात आले.




