
विद्यार्थ्याने प्रामाणिकपणे मूळ मालकाला केली परत
अमळनेर : शेतात जातांना सापडलेले दोन मोबाईल सह पैसे व कपडे असलेली पिशवी मंगरूळ येथील स्व आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्याने प्रामाणिकपणे मालकाला परत केले आहे. मोबाईल मध्ये अत्यंत महत्वाचे कागदपत्र असल्याने मालकाने विद्यार्थ्याचा मोठा सत्कार केला.
मंगरूळ येथील स्व आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता ८ वी चा विद्यार्थी वेदांत विशाल पाटील हा ७ रोजी आपल्या भावासह शिरूड रस्त्यावर शेतात जात असताना त्याला रस्त्यात कपडे असलेली पिशवी , त्यात पैसे असलेली पर्स आणि दोन मोबाईल होते. वेदांत ने सर्व वस्तू वडील विशाल पाटील यांना विचारून घरी आणले. दोघांनी वर्गशिक्षक संजय पाटील यांना घटना सांगितली त्यादरम्यान मोबाईल वर आलेल्या कॉल वरून मूळ मालकाचा शोध लागला. त्या वस्तू पारोळा तालुक्यातील इंधवे येथील पोलीस पाटील शीतल ज्ञानेश्वर पाटील यांच्या असल्याची माहिती मिळाली. त्या मोबाईल मध्ये त्यांच्या पतीचे आर्मीचे महत्वाची कागदपत्रे तसेच मुलीच्या नीट परीक्षेचा सर्व अभ्यासक्रम असल्याने ते कुटुंब व्यथित झाले होते. शीतल पाटील यांना मंगरुळचे पोलीस पाटील भागवत पाटील यांनी वस्तू घेण्यासाठी मंगरूळ येथील स्व आबासो अनिल अंबर पाटील शाळेत बोलावले सर्वांसमक्ष वस्तू परत करण्यात आल्या. मोबाईल मधील अमूल्य कागदपत्रे आणि सर्व अभ्यासक्रम जसाच्या तसा परत मिळाल्याने शीतल पाटील यांनी आपल्या कुटुंब व नातेवाईकांसह वेदांत चा सत्कार करून त्याला अकराशे रुपयांचे बक्षिस दिले.
यावेळी शीतल पाटील , मंगरूळ पोलीस पाटील भागवत पाटील , जिराळी पोलीस पाटील भाऊसाहेब पाटील , विशाल पाटील ,वर्गशिक्षक संजय पाटील , सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील , महेश पाटील , योगेश पाटील , संदीप पाटील , विनोद पाटील , चंद्रकांत पाटील , लक्ष्मण पाटील , सौरभ पाटील , विलास पाटील , रवींद्र वडार ,सोनू भिल , अशोक सुर्यवंशी, शिक्षिका सुषमा सोनवणे ,शीतल चव्हाण , सीमा मोरे , चंद्रशेखर पाटील ,सुदर्शन पवार ,खुशाल पाटील हजर होते.
सध्याच्या युगात मुलांमध्ये मोबाईल ची आवड आणि पैसे खर्च करण्याची प्रवृत्ती असते अनेकदा मुले घरच्यापासून अनेक बाबी लपवतात. मात्र वेदांत पाटील याने दाखवलेला प्रामाणिक पणा कौतुकास्पद आहे. – शीतल ज्ञानेश्वर पाटील ,पोलीस पाटील , इंधवे ता पारोळा.




