
अमळनेर – नाविन्य प्रतिष्ठान संचलित धार-मालपूर येथील विपश्यना ध्यान केंद्रातर्फे तालुक्यातील ज्या पुरुष व महिला साधकांनी यापूर्वी दहा दिवसीय विपश्यना शिबिर पूर्ण केलेले असेल. अशा साधकांसाठी रविवार रोजी सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत विपश्यना ध्यान केंद्र, अमळनेर- मारवड रस्ता, प्रताप महाविद्यालयापासून चार कि.मी. अंतरावर एकदिवसीय विपश्यना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी साधकांनी शिबिरात सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजक डॉ.बी.एस.पाटील यांनी केले आहे.

