
अमळनेर– अमळनेर पोलीस ठाण्याचा लँडलाइन क्रमांक गेल्या ८ दिवसांपासून बंद आहे. वास्तविक पाहता हा दूरध्वनी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र सार्वजनिक कार्यालयात फोन बंद असल्याने नागरिक संभ्रमात पडले आहेत.

फोन करणाऱ्या व्यक्तीला रिंग वाजते पण फोन ची रिंग पोलिसांना येत नाही अशी गत आहे. वारंवार काहीही तातडीची घटना घडल्यास मात्र घडून जाईल तरी माहिती मिळणार नाही अशी अवस्था पोलिसांची आहे. पोलीस ठाण्याचा क्रमांक हा सार्वजनिक असतो त्यावर काहीही माहिती देऊ शकतात. बीएसएनएलचे कर्मचारी मात्र दुरुस्तीसाठी येत नसल्याने पोलिसांनी डोक्याला हात मारून घेतला आहे.

