
अमळनेर : गांधीनगर अतिक्रमणाबाबत अमळनेर न्यायालयाने १३ पर्यंत जैसे थे चे आदेश दिले होते. आज या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी होणार आहे.

गांधीनगर मधील रहिवाशी ताराचंद चौधरी , सरुबाई ठाकूर , सुधाकर सूर्यवंशी , युनूस बागवान , यास्मिन बागवान यांनी पालिकेच्या अतिक्रमण हटाव विरोधात न्यायालयात दाद मगितली होती. मात्र याचिकाकर्त्यांना उशीर झाल्याने तोपर्यंत अतिक्रमण निघून गेले होते.
मात्र गांधीनगर वासीयांना म्हाडा मध्ये घरकुल दिले याबाबत संभ्रम असल्याचे गांधीनगर वासीयांचे म्हणणे आहे. त्याच प्रमाणे हे सर्व रहिवाशी मजूर असल्याने म्हाडा कॉलनीतून मजुरीसाठी शहरात येणे आणि दवाखाना ,मुलांचे शिक्षण आदींसाठी अवघड आहे. त्यामुळे त्यांना शहरातच जागा द्यावी अथवा त्याच ठिकाणी राहू द्यावे अशी रहिवाश्यांची मागणी आहे. न्यायालयाने पालिकेला एका मुद्द्यावर खुलासा करण्यासाठी १३ तारखेपर्यंत मुदत दिली होती व जैसे थे चे आदेश दिले होते. त्यामुळे १३ पर्यंत पालिकेला अथवा रहिवाश्याना काहीच करता येणार नव्हते. न्यायालय काय निर्णय देते यावर साऱ्यांचे लक्ष लागून आहे. दरम्यान माणुसकीच्या नात्याने आणि गरिबांचा विचार करून प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून गांधीनगर वासीयांना गावातच सोय करावी अशी मागणी विनोद पाटील , योगेश मिस्त्री यांच्यासह इतरांनी केली आहे.

